Press "Enter" to skip to content

दिपक फर्टिलायझर्स ऍण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन व ईशान्य फाउंडेशन मार्फत “आरोग्य जनजागृती कार्यक्रम”

सिटी बेल ∆ तळोजा एमआयडीसी ∆

दिपक फर्टिलायझर्स ऍण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन व ईशान्य फाउंडेशन मार्फत “आरोग्य जनजागृती कार्यक्रम” पाले खुर्द येथे आयोजित करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन श्रीमती अंजू दिनेशप्रताप सिंग मॅडम आणि श्रीमती अरुणा किरण दाभाणे (माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी डॉ. प्राची आंबोळकर (आहारतज्ज्ञ), श्रीमती. रश्मी जोशी (वरिष्ठ व्यवस्थापक-DFPCL), श्रीमती शची कस्तुरे (व्यवस्थापक – एचआर DFPCL), श्रीमती वर्षा केसरकर (व्यवस्थापक-प्रशासक DFPCL), जेनिफर रॉड्रिग्स (वरिष्ठ व्यवस्थापक-समन्वय DFPCL), श्री प्रदीप तांडेल (डीजीएम- सुरक्षा आणि अग्निशमन DFPCL) आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्क्रमास तळोजा परिसरातील व गावामधील सुमारे ८० पेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात DFPCL च्या महिला कर्मचार्‍यांनी महिलांसाठी विविध खेळ स्पर्धा आयोजित केल्या, ज्यामुळे महिलांमध्ये आनंददायी आणि प्रतिसाद देणारे वातावरण निर्माण झाले. डॉ. प्राची यांनी महिलांच्या जीवनातील आहाराचे महत्त्व आणि निरोगी जीवनासाठी महिलांनी कोणत्या आहाराला प्राधान्य द्यावे याबद्दल माहिती दिली. श्री प्रदिप तांडेल यांनी घरातील गॅस व विधुत उपकरणे वापरतावेळी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. श्रीमती अंजू सिंग मॅडम यांनी महिलांचे कुटुंबातील महत्व किती महत्वाचे आहे व संपूर्ण कुटुंबाचा विकास व आरोग्य हे महिलेवर अवलंबून असतो याविषयी मार्गदर्शन केले.

श्रीमती अरुणा किरण दाभाणे यांनी डीएफपीसीएल व ईशान्य फाउंडेशन राबवत असलेल्या सीएसआर उपक्रमांचे कौतुक केले आणि महिलांना या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच, या कार्यक्रमात ईशान्य फाउंडेशन याच्या महिला प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत “टेलरिंग” कोर्स पूर्ण केलेल्या 80 सहभागींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

श्री. संदिप आर. काकडे-सीनियर व्यवस्थापक-सीएसआर DFPCL, श्री. योगेश पाटील-प्रकल्प समन्वयक-इसफॉन व टीम यांनी कार्यक्रमासाठी संपूर्ण नियोजन व आवश्यक व्यवस्था केली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.