सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष कमकुवत होत असल्याचे पाहवयास मिळत असल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रायगडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य पदी नुकतीच नियुक्ती केल्यामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष उंच भरारी घेणार असल्याचे पेण शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले आहे.
देशासह राज्यात कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी या वर्गाल न्याय देण्याची भुमिका सातत्याने घेण्यात आली देशाच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात आल्या मात्र मागच्या काही वर्षांपासून या सरकारने स्वताच्या मर्जीनुसार देशाची सुत्रे भांडवल शाहीच्या हाती देऊन प्रत्येक वस्तूंवर भरमसाठ दरवाढ केली असल्याने सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे त्यामुळे या सताधा-यांना खुर्चीतून खाली खेचण्यासाठी कॉग्रेस पक्षच असल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जी भारत छोडो यात्रा केली त्यामध्ये अनेकांनी सहभाग घेऊन काँग्रेसला उभारी देण्याचे कार्य सुरू केले आहे.त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यावर आणखी एक जबाबदारी देऊन त्यांची भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती केल्यामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात उंच भरारी घेणार असल्याचे प्रविण पाटील यांनी सांगितले.
Be First to Comment