सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संचालित डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाचा २५ वा वर्धापन दिन आणि डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या २६ व्या स्मृती दिनानिमित्त २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत तज्ञ डॉक्टरांकडून डोळे तपासणी, जनरल मेडिसीन, नाक, कान, घसा, अस्थि रोग, महिलांचे आजार, दंत रोग, त्वचारोग या रोगांवर मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच रोगाचे निदान झाल्यावर शस्त्रक्रियेमध्ये २५ % सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९९६७६५२७५७, ८९७६९९०५४१, ८९७६९९०५४२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
दरम्यान यानिमित्ताने रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या वतीने मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांच्या ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Be First to Comment