सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
पेण तालुक्यात मनसेच्या सदस्य पदापासून तालुका अध्यक्ष पदापर्यंत तन-मन-धनाने काम करणारे तालुकाध्यक्ष रुपेश पाटील हे पक्षा अंतर्गत गटबाजीमुळे नाराज होऊन असंख्य कार्यकर्त्यांसह लवकरच शिंदे गटात दाखल होणार आहेत.
रुपेश पाटील हे मागील १५ वर्षे मनसेचे काम करत असल्याने त्यांनी पेणमध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक, धार्मिक कार्यासह पक्ष बांधणी मोठ्या प्रमाणावर केल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ते प्रचलित झाले होते याच उद्देशाने त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे, आमदार राजू पाटील, यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यां बरोबर आपले हितसंबंध जोपासले होते.
मात्र पेणमध्ये वारंवार होणाऱ्या पक्षांतर्गत गटबाजीमुळे अखेर नाराज होऊन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पेणमध्ये मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे गटात दाखल होण्याची तयारी दाखवल्याने येत्या काही दिवसात पेण मधील मनसेला मोठी खिंडार पडणार असल्याचे रुपेश पाटील यांनी सांगितले आहे.
Be First to Comment