उत्सवात १०० किलो धान्यांच्या रांगोळी ने भक्तातांचे वेधले लक्ष्य
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
गणपती उत्सव हा मराठी महिन्यातील माघ महिन्यात येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा करण्यात येतो.विशेष करून महराष्ट्रात असलेल्या अष्टविनायक मंदिरात भाविक भक्ताची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यांने या वरद विनायाकाचे दर्शन घेण्यासाठी या ठीकाणी यात्रे सारखे प्रचंड स्वरूप प्राप्त झालेले होते.मुंबई -पुणे महामार्गावर असलेले अष्टविनायका पैकी महड गावातील वरद विनायक येथे गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
माघी गणपती उत्सवाच्या निमित्ताने महड येथील मंदिरात भव्य दिव्य अशी धान्याची रांगोळी ( वरद विनायक फुल रांगोळी मंडळ )यांनी साकारली रांगोळी चे सुंदर असे दृश भक्तगणांनाचे मन आकर्षिले जात होते .आणि आपल्या जवळ असलेल्या मोबाइल.मध्ये टिपण्याचा प्रयत्न करीत होते.अशीच सुंदर रांगोळी रवि आचार्य (नेरळ ) आणि मंगेश देशमुख ( मानकीवली ) तुळशीराम ठोंबरे – टेंभरी,सचिन पाटील – कलोते, तसेच रांगोळी साठी अर्थ सहाय्य बकुल आरोमॅटीक कंपनी पाताळगंगा यांनी केले.
रांगोळी काढण्यासाठी १०० किलो धान्यांचा वापर करण्यात आला.तसेच ह्या रांगोळी साठी वीस तास एवढा कालावधी लागला.या रांगोळी साठी शाबुदाणे, कणी,बाजरी, तीळ, यामध्ये हिरवा,पिवळा,लाल, पांढरा,निळा असे कलर्स वापरण्यात आले अदि धान्यांचा वापर करण्यात आला.या रांगोळी मध्ये गणपती असून यामध्ये शंकर,संत तुकाराम महाराज यांचे चित्र रांगोळी च्या माध्यमातून रेखाटण्यात आले.
Be First to Comment