Press "Enter" to skip to content

मनसेचे जिल्हा सचिव जे.पी.पाटील यांनी कुटुंबिया समवेत राज ठाकरेंंची घेतली सदिच्छा भेट

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆

रायगड जिल्ह्यातील कट्टर राज ठाकरे समर्थक असलेल्या जिल्हा सचिव जे.पी.पाटील यांनी राज ठाकरे यांची कुटुंबिया समवेत सदिच्छा भेट घेत अनेक विषयावर सविस्तर केली.याप्रसंगी मनसेचे रायगड जिल्हा सचिव जे.पी.पाटील यांच्या समवेत शिवम पाटील व प्रशांत पाटील हे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील सत्तातरनंतर राजकीय घडामोडी चांगल्याच तापल्या असता शिवसेनेतील फुटीचा काही पक्षांना फायदा होऊ शकतो, या हेतूने अनेक राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत असताना रायगड जिल्ह्यातील राजकारणात मोठे फेरबदल होत असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरेंवर प्रेम करणारे – कट्टर राज ठाकरे समर्थक तथा मनसे रायगड जिल्हा सचिव जे.पी.पाटील यांनी आपल्या कुटुंबिया समवेत राज ठाकरे यांनी सदिच्छा भेट घेतली. तर यावेळी सचिव जे.पी.पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सोबत अनेक विषयांवर चर्चा केली असुन कर्जत खालापुरातील पक्षाची वाटचाल कशा पध्द्तीने आहे याची माहिती पाटील यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.