न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरीनाथ नारायण पाटील यांनी केले पाटील कुटुंबीयांचे सांत्वन
सिटी बेल ∆ रसायनी ∆
देवळोली येथील अनंत नारायण पाटील यांना रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी देवाज्ञा झाली. अकाली आलेल्या ब्रेन स्ट्रोक सोबत त्यांची झुंज अखेर संपली आणि पाटील कुटुंबीयांसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली.न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अनंत पाटील हे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष होते. शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील यांचे ते पिताश्री.
न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ नारायण पाटील यांनी संघटनेतील अन्य पदाधिकाऱ्यांच्या समवेत देवळोली येथील पाटील कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. पोलीस पाटील संघटनेचे राज्यभराचे काम अत्यंत खूबीने करणारे अनंत पाटील हे संघटनेमध्ये सगळ्यांना हवे हवेसे वाटायचे. त्याच सोबत गावठाण विस्तार आणि एच ओ सी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परत मिळवून देणे या ध्येयाने ते अक्षरशः फछाडून गेले होते. पोलीस पाटील म्हणून आपली जबाबदारी योग्य रीतीने ते पार पाडत. संघटनेचा गाडा सुयोग्य पद्धतीने हाकत. गावठाण विस्तारासाठी बैठका घेणे, ग्रामस्थांचे प्रबोधन करणे, शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणे अशा कामांसाठी त्यांनी पायाला अक्षरशः भिंगरी लावली होती. हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल्स कंपनीमध्ये असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होऊन देखील त्यांचा प्रकल्पामध्ये वापर होत नाही. तूर्तास तर हा प्रकल्प देखील संकुचित स्वरूपात सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत हे स्वप्न उराशी बाळगून अनंत पाटील काम करत असायचे.
अनंत पाटील यांच्या जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ते आमचा आदर्श होते,त्यांच्यासारखे काम करणे आम्हास शक्य नाही,परंतु त्यांना अभिप्रेत असणारे काम उभारणे हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल अशी प्रतिक्रिया संघटनेतील सदस्यांनी दिली. अनंत पाटील यांचे दशविधी कार्य 27 डिसेंबर श्री क्षेत्र देवाची आळंदी येथे होणार असून होम विधी 28 तारखेला होईल. 30 डिसेंबर रोजी तेराव्याचे विधी आणि उत्तर कार्य देवळोली येथील निवासस्थानी संपन्न होणार आहे.
यावेळी देवेंद्र पाटील आणि कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पंढरीनाथ नारायण पाटील कोकण प्रांत अध्यक्ष संजय पाटील महादू दादा पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष,रामदास म्हात्रे रायगड जिल्हा विभागीय अध्यक्ष,सुरेश सोनावणे,जिल्हा संघटक,जनार्दन पाटील पनवेल तालुका अध्यक्ष,भरत पाटील.. पनवेल तालुका सचिव,दीपक पाटील .पनवेल तालुका खजिनदार,
प्रमोद आगलावे, पनवेल तालुका संपर्कप्रमुख, कांतीलाल पाटील, रायगड जिल्हा सदस्य,श्रीराम धुळे कर्जत तालुका सदस्य हरिभाऊ पाटील यादव म्हात्रे, तुर्भे पोलीस पाटील दीपक पाटील, उसर्ली पोलीस पाटील,कोंडीराम पाटील, चिंद्रण,कैलास गरूडे. आदई पोलीस पाटील,अस्मिता येंदरकर.. महाराष्ट्र सल्लागार,तनुजा पाटील..ठाणे जिल्हा अध्यक्ष,निता पाटील.. ठाणे जिल्हा सदस्य,अर्चना बाबरे.. बारवई पोलीस पाटील,जोस्त्ना म्हसकर.. कोप्रोली अनीता आदईकर… कुत्तरपाडा धनाजी मुने..कर्जत तालुका सदस्य,अशोक गायकवाड.. कर्जत तालुका सदस्य,नरेश तुपे कर्जत तालुका सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
Be First to Comment