सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
मागच्या काही दिवसांपासून विरोधकांनी मला सरपंच पदावरून हटविण्याचा घाट घातला असून माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत आहेत मात्र विरोधाकांना जशाच तसे उत्तर देऊन जनतेच्या आशिर्वादाने वडखळ ग्रामपंचायतीची कारकीर्द मी पुन्हा पुर्ण करणार असल्याचे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
तर नुकतेच वडखळ उपसरपंचासह आठ सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी त्यातील एकच सदस्य हा राष्ट्रवादीचा असून उर्वरित इतर पक्षांचे आहेत त्यामुळे अशा ढोंगी लोकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होणार वडखळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे.त्यामुळे पुढच्या दोन महिन्यातच विरोधक परत येणार असल्याचे सांगून खासदार सुनील तटकरे यांनी या भागाकरीता भक्कम निधी उपलब्ध करून दिला असून त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे येथे होत आहेत.परंतु काही कामांबाबत विरोधकांनी मला कोंडीत पकडण्याचा डाव जरी टाकला असला तरी त्यांचा डाव मी उधळून लावणार आहे.जनतेने कोणत्याही भ्रमात न राहता येणाऱ्या निवडणुकील आपण सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी पं.स.सदस्या पूजा मोकल, सदस्य जगदिश म्हात्रे, धनाजी नाईक, सदस्या अनिता म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, जयवंती म्हात्रे, माजी सरपंच सुनील जांभळे, मनोहर कोळी, ज्येष्ठ नेते अशोक म्हात्रे, के.डी.पाटिल, विजय गायकवाड आदि उपस्थित होते.
Be First to Comment