उलवे नोड वासियांना अखेर १७ वर्षांनी मिळणार हक्काची स्मशानभूमी
सिटी बेल ∆ उलवे नोड ∆
उलवे नोड ची स्थापना होउन गेल्या १७ ते १८ वर्षात २ लाखाहुन अधिक लोक रहायला आले परंतू कुणाचा मृत्यु झाल्यास अंत्यविधीसाठी उलवे नोडसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे, प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांना विनंती करावी लागत असे, त्यातील अनेक गावांनी नोडमधील मृतांना त्यांच्या स्मशानात जाळण्यासाठी मज्जाव केल्यामुळे, मयत घेऊन नातेवाईकांना सि. बी. डी. बेलापूर, खारघर, वाशी येथे अंत्यविधीसाठी जावे लागत असे.अश्या अनेक सुविधा मिळवून देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे लढाऊ डॅशिंग नेते महेंद्र घरत यांना समस्याग्रस्त उलवे नोडच्या समस्या सोडविण्यासाठी मदतीची आर्त साद घातली.
गोरगरीब प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडविण्यामध्ये माहीर असलेल्या महेंद्र घरत यांनी सिडको स्तरावर जॉईंट एमडी बरोबर उलवे नोड नागरिकांच्या मिटींग घेऊन तातडीने हालचाल करून उलवे नोड समस्या सोडविण्यासाठी तातडीने सुरवात केली.
सर्वप्रथम उलवे नोडमधील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून घेतले, पाणीपुरवठा अतिशय कामिदाबाने उलवे नोडमध्ये होत होता, सिडको, MIDC नवी मुंबई, पनवेल कॉर्पोरेशन च्या अधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या स्तराच्या मिटिंग लावून उलवे नोडमधील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करून उलवे नोडसाठी हक्काची स्मशानभूमी सेक्टर १४ मध्ये बांधत घेतली व उलवे नोड वासीयांची मृत्यू नंतर होत असलेली ससेहोलपट थांबवली.
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे उलवे नोडमधील सर्व समस्या निराकरणासाठी महेंद्र घरत कटिबद्ध आहेत असे दाखवून दिले.
उलवे नोडमधील शाळा, कॉलेज, गार्डन, मंदिर, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, महिला मंडळ सर्व सामाजिक सुविधांचे प्लॉट चे टेंडर काढण्यास भाग पाडले.यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून,भुमीपुत्र भवनचे टेंडर काढेपर्यंत पाठपुरावा केला. आज भुमीपुत्र भवन उलवे नोड मध्ये दिमाखात उभे आहे.
Be First to Comment