सिटी बेल ∆ पनवेल ∆
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित एका सभेत पनवेल शहर चिटणीसपदी शेकापचे कट्टर कार्यकर्ते नंदकिशोर भोईर यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्याकडून करण्यात आली.
कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते हे नियुक्त पत्र देण्यात आले. याप्रसंगी पनवेल वि.स. विभाग अध्यक्ष काशिनाथ पाटील, महानगरपालिका माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष दत्तात्रेय पाटील, जिल्हा सहचिटणीस प्रकाश म्हात्रे, पनवेल अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. हितेंद्र शहा, मा. नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे, अरविंद म्हात्रे, गणेश पाटील,रवींद्र भगत, डॉ. सुरेखा मोहोकर, अतुल भगत, सुनील बहिरा, दिनकर म्हात्रे व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनीच नंदकिशोर भोईर यांचे हार्दिक अभिनंदन केले व एका निष्ठावंताला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
Be First to Comment