Press "Enter" to skip to content

चौक वावंढळवाडी येथील काकडा आरती सोहळ्याची सांगता

जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल सुरू करीत असताना काकडा आरतीची आज गरज आहे – सरपंच रितु ठोंबरे

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

पहाटे देवाला उठवताना काकडा आरती केली जाते,त्याच प्रमाणे जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करताना धैर्य व उद्दिष्ठाची काकडा आरती करणे गरजेचे आहे,तरच मनुष्य जन्माचे सार्थक होईल,असे उदगार नवनिर्वाचित सरपंच रितु ठोंबरे यांनी काढले.

चौक वावंढळवाडी येथे सालाबादप्रमाणे काकडा आरती संपन्न झाली.या सोहळ्याचा सांगता कार्यक्रम सरपंच रितु ठोंबरे यांच्या उपस्थित पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, जीवन आत्मज्ञानानं भरून घेण्यासाठी संतजणांचा सहवास अत्यंत गरजेचा आहे,त्यासाठी संत परंपरा व वारकरी संप्रदाय गरजेचा आहे. काकडा आरती का करावी व त्याचे महात्मे यावर हभप.संदीपमहाराज यांनी उपस्थितांना विवेचन केले.यावेळी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय चे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे, प्रवचन कीर्तनकार व सातत्याने मार्गदर्शन करणारे हभप. संदिपमहाराज यादव यांचा पत्रकार अर्जुन कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधितज्ञ राजेन्द्र मोरे,पत्रकार अर्जुन कदम, हभप. रमेशमहाराज महाडीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.गेली चोवीस वर्षे या काकडा आरती कार्यक्रमाचे सातत्य कायम ठेवणारे हभप.कमलाकर काईनकर, सामाजिक कार्यकर्ते व अपघातग्रस्त मदतनीस रामदास काईनकर, हभप.भोळा व अर्जुन काईनकर यांचा सत्कार पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रितु ठोंबरे यांनी केला.

पुढच्या वर्षी होणारा कार्यक्रम रौप्य महोत्सवी असल्याने आज पासूनच त्याची तयारी सुरू केल्याचे रामदास काईनकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला सुप्रसिध्द गायनाचार्य व मृदुंगमनी हभप. महेश महाडीक,हभप.अरुण दळवी, हभप.बबन ठोंबरे, सरपंच सौ. संध्या निकम, संतोष महाडीक,माजी उपसरपंच दिपक पंदेकर, आप्पा कुळकर्णी यांच्यासह पंचक्रोशीतील वारकरी,ग्रामस्थ,महिला व तरूण वर्ग मोठ संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.