शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवतीर्थ वर कार्यकर्त्यांशी साधला संवाद
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत तालुक्याचा कायापालट करण्याचा विडा आमदार महेंद्र थोरवे साहेब यांनी उचलला आहे असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कर्जत मध्ये केले.
महाराष्ट्र राज्यातील बाळासाहेबांची शिवसेना या सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कर्जत मधील आपल्या खाजगी सामाजिक दौरासाठी वदप येथे हजेरी लावली त्याप्रसंगी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उपस्थिती दाखवली.
शारीरिक शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे कर्जत येथे जंगी स्वागत करण्यात आले, या प्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख विजय पाटील उपजिल्हाप्रमुख भाई गायकर,ज्येष्ठ नेते बंधू पाटील, ज्येष्ठ नेते संतोष भोईर, विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, मनोहर थोरवे, संतोष विचारे, सुनील रसाळ, हर्षद विचारे, संतोष कोळंबे, प्रशांत झांजे, गणेश पालकर, संकेत भासे आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील आरोग्य शिबिरानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवतीर्थ पोसरी येथे भेट दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांची थेट संवाद साधला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्याचा गौरव करत कर्जतचे युवा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उल्लेखनीय कामाचे विशेष कौतुक केले.
Be First to Comment