धूतपापेश्वर ते दगडी शाळा येथे पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन
सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पाठपुरवठ्यातून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील धूतपापेश्वर ते दगडी शाळा येथे पिण्याच्या पाण्याची ८ इंच व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असून या विकासकामाचे भूमिपूजन माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आज (दि. ०१ नोव्हेंबर) करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, दर्शना भोईर, नीता माळी, नंदा ओझे, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, बूथ अध्यक्ष सुशांत पाटणकर, सोहन जोशी, तन्मय पटवर्धन, अदिती ओझे, महेंद्र गोडबोले, प्रशांत शेट्ये, तसेच सी जे मुनोत नगर ए विंग ते जी विंग, पुरुषोत्तम सदन, गोविंद अनंत, गुरु आशिष, आदित्य विहार, मंगल कलश, श्री स्वामी समर्थ, श्री सदन इत्यादी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
पनवेल शहराचा भौगोलिक विचार करता महात्मा फुले रस्ता, टिळक रस्ता, राम गणेश गडकरी रस्ता हा परिसर पनवेल मधील अत्यंत प्राचीन परिसर मानला जातो. या परिसरात अनेक वाडे अस्तित्वात होते. कालांतराने शहरीकरणामुळे सदर वाड्यांचे रूपांतरण विविध सोसायटीमध्ये झाले, परिणामी लोकसंख्या देखील वाढली परंतु एवढ्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा योग्य मुबलक प्रमाणात होताना दिसून येत नव्हता तसेच भविष्यातील टोलेजंग इमारतींचा डेव्हलपमेंटचा विचार लक्षात घेता महात्मा फुले रस्त्यावर धूतपापेश्वर ते दगडी शाळा एवढ्या पट्ट्यात होणारा पाणी पुरवठा अपुरा आहे. सदर पट्ट्यात एक ८ इंच व एक ६ इंच व्यासाच्या दोन पाण्याच्या लाईन्स आहेत.
दरम्यान कोविड काळात सदर भागातील ६ इंची च्या पाईपलाईन मध्ये ड्रेनेज पाणी मिसळले गेले, ती ६ इंचाची लाईन पूर्णपणे बंद करून पूर्ण भार हा ८ इंची लाईनवर टाकावा लागला होता, त्यामुळे रुचिता लोंढे यांनी धूतपापेश्वर ते दगडी शाळा येथे ८ इंच व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी महानगरपालिकडे केली होती, त्या अनुषंगाने ७ लाख ८५ हजार ४१३ रुपयांच्या या कामाला मंजूरी मिळून या कामाला प्रारंभ झाला आहे. त्यानुसार सि.जे मुनोत नगर ए विंग ते जी विंग, आदित्य विहार सोसायटी,मंगल कलश सोसायटी,श्री स्वामी समर्थ सोसायटी,श्री सदन सोसायटी आणि नव्याने होऊ घातलेली गुरु आशिष सोसायटी या सर्व सोसायट्यांना होणारा पाण्याचा त्रास कायमचा संपुष्टात येणार आहे व प्रत्येक सोसायटीच्या प्रत्येक विंगला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्याबद्दल परिसरातील नागरिक आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांना धन्यवाद देत आहेत.
Be First to Comment