काँग्रेस भवन पनवेल येथे स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी
सिटी बेल ∆ पनवेल ∆
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री, पोलादपूरुष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारत रत्न स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी कॉंग्रेस भवन येथे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित पांडुरंग पाटील यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास कॉंग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, शशिकांत बांदोडकर, सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष माया अहिरे, पनवेल शहर ब्लॉक अध्यक्ष लतीफ शेख, नवीन पनवेल अध्यक्ष राहुल जानोरकर, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अमित दवे, खांदा कॉलनी अध्यक्ष जयवंत देशमुख, अध्यक्ष, रोजगार व स्वंयरोजगार विभाग अध्यक्ष नित्यानंद म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस प्रीतेश साहू, चेतन म्हात्रे, जिल्हा युवक उपाध्यक्ष अभिजित मुडक्कल, पनवेल युवक अध्यक्ष राकेश जाधव, सुमित अभार, नीता शेणीय, आरती ठाकूर आदी नेते ‘व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment