सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
जीवन सुखदायी, संपन्नदायी, समृध्दीने परिपूर्ण बनण्यासाठी उत्तर भारतीय समाजाच्या वतीने पाताळगंगा नदिच्या ठिकाणी छटपूजा करण्यात आली.यामुळे पाताळगंगेचा संपूर्ण परिसर उत्तर भारतीयांमुळे गजबजून गेल्यांचे पहावयास मिळाले. महिलांची त्यांच्या कुटुंबासमवेत छट पुजा करण्यासाठी गर्दि असल्यामुळे या ठिकाणी यात्रे सारखे प्रचंड स्वरूप निर्माण झाले होते.
उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर छटपूजा आयोजित केली जाते; परंतु ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे. त्या गंगेच्या किनारी पूजेला जास्त महत्त्व असल्याने उत्तर भारतीय धार्मिक ठिकाणाच्या नदीकिनारी जाऊन पूजा करण्यात आली.
नदीतीरावर छटपूजेसाठी महिलांनी उसाचे चौरंग मांडून पूजा करुन नदि पात्रात दिवे सोडण्यात आले. त्याच बरोबर प्रसाद म्हणजे पूजेसाठी आनलेली फळे एकमेकांना प्रसाद म्हणून देण्यात आला. छटपूजेनिमित्त सूर्याला अर्घ्य दिल्याने परिवाराला सुख, समाधान प्राप्त होते.असे मत यावेळी योगेंदर प्रसाद,सनी प्रसाद,शरद प्रसाद,पिंटू प्रसाद,मंटू प्रसाद, अनिल भगत,यांनी व्यक्त केले.
आयुष्यात कोणतेही संकट येऊ नये, जीवनात भरभराटी, उन्नती होण्यासाठी महिला छटपूजा करतात. त्या घरीच दोन दिवस उपवास करतात व रात्री खीर व फळे खातात. तिस-या दिवशी संध्याकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देतात व चौथ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य जल देऊन तीन दिवसांचे उपवास सोडत असतात - किरण प्रसाद
Be First to Comment