हिंमतीने पुढे येणाऱ्या महिलांचा सन्मान हि समाजासाठी प्रेरणा – आ. प्रशांत ठाकूर
सिटी बेल ∆ पनवेल ∆
हिंमतीने पुढे येणाऱ्या महिलांचा सन्मान हि समाजासाठी प्रेरणा असल्याचे मत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे व्यक्त केले.
इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नवद्योजिकांचा पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते .
या समारंभाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील, पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर , पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, रोटरी डिस्ट्रिक चेअरमन डॉ. अनिल परमार, इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षा साधना धारगळकर, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी ,सचिव योगिनी वैदू व रंगनील नाट्य संस्थेच्या अध्यक्षा कल्पना कोठारी उपस्थित होते.
यावेळी नवउद्योजिकांच्या पाऊलखुणा या पुरस्कार सन्मान सोहळ्यात आपल्या उद्योग व्यवसायाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला अशा पंचवीसहुन अधिक नवद्योजिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विशेष लक्षवेधी असे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये स्वाती मोहिते, सुनंदा कोठारी, वृषाली सावळेकर, रुचिता लोंढे यांना सन्मानित करण्यात आले.
यापुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले पनवेल आणि परिसरामध्ये येत्या काळात उद्योगाचे मोठे जाळे येणार आहे या उद्योग क्षेत्रात केवळ पुरुष च नाही तर महिलांनी सुद्धा पुढे यावे . पनवेल परिसरात वाढणारी लोकसंख्या हि भविष्यात सर्वांसाठी मोठी बाजार पेठ असेल असे त्यांनी सांगितले यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी आपल्या भाषणात उद्योजक पैशाने उभा राहतो असे नाही तर त्याच्यामध्ये जिद्द असली पाहिजे व्यवसायाचे बाजारपेठ निर्माण कार्याची असेल तर प्रामाणिकपणा असला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले तर कार्यक्रमाची संकल्पना रंगनील नाट्य संस्थेच्या अध्यक्षा कल्पना कोठारी यांनी मांडली उपस्थितांचे आभार डॉ. शितल कांडपिळे – फरांडे यांनी मानले.
यावेळी देवयानी कर्वे- कोठारी व संविधा पाटकर यांच्या मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाला वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, माजी नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पुंडे यांनी केले.
Be First to Comment