प्रथम क्रमांक म्हणून श्रुती शिर्के हिला मिळाली स्कूटी दुचाकी
सिटी बेल ∆ पनवेल ∆
करंजाडे येथील सेक्टर येथील मैदानावर आयोजित केलेला शेकाप पुरस्कृत गरबा दांडिया २०२२ ची सांगतात दसऱ्याला करण्यात आली. गेल्या नऊ दिवस उत्साहामध्ये गरबा साजरा करण्यात आला. महिलांनी दांडीया खेळण्याचा आनंद घेतला. यामध्ये पनवेल येथील श्रुती शिर्के हि पहिल्यता मानाची मानकरी ठरली. यावेळी उपस्तित असलेले माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, ममता प्रीतम म्हात्रे, तसेच सरपंच रामेश्वर आंग्रे, मंगेश बोरकर तसेच मित्रमंडळ यांच्या उपस्तित शिर्के हिला स्कूटी दुचाकी देण्यात आली.
गरबा आणि दांडिया प्रेमी नवरात्रोत्सवाची अतुरतेने वाट पाहत असतात. नृत्याचा आनंद घेण्यासाठी तरूणाईसह महिलांना अधिक आवड आहे. दांडिया नृत्य करण्यासाठी मोठ्या जागेची गरज लागते. यावर्षी करंजाडे वसाहतीतील येथील सेक्टर चार साकार अकॅडमीचे हार्दिक गोखणी यांच्या मैदानावर शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गरबा दांडिया रास २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत पाटील यांनी उपस्तित दर्शवित शुभेच्छा दिल्या. तसेच माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही प्रस्त्यक्षात भेट देत करंजाडेकरांना नवरात्रोत्सव व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या नऊ दिवस दांडीया नृत्याची हौस पूर्ण करण्यासाठी तरूण – तरूणी मोठ्यासंख्येने उपस्तित होते. रोजच्या रोज सुमारे पाचशे ते एक हजार नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत होते. तरूणाई दांडीया खेळण्याचा आनंद घेत होते. यावेळी एरणीच्या देवा तुला…. परी हू मैं या… झींगाट या संगीताच्या तालावर नवरात्रोत्सव गरबा रंगू लागला होता. पारंपारीक वेशभूषेत तरूणाई थिरकली. करंजाडे येथील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या पधाधिकाऱ्यानी त्याचबरोबर स्वतः रामेश्वर आंग्रे व योगेंद्र कैकाडी यांनी या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी महिलासाठी, मुलांसाठी तसेच लहान मुलासाठी असे वेगवेगळी दांडिया खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. यावेळी गरबा व दांडीया खेळण्यासाठी तरूणाईकडून वेगवेगळ्या प्रकारचे पोषाक परिधान केला होता. यावेळी उत्कृष्ट वेशभूषा आणि दांडीया खेळणाऱ्या स्पर्धकांना पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक श्रुती शिर्के, दुसरा क्रमांक प्रणय चौधरी, तसेच तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी म्हणून ऋषी कइनाकर ठरला.
यावेळी माजी विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, ममता म्हात्रे तसेच सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आली.
Be First to Comment