सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆
कट्टर शिवसैनिक मराठी उद्योजक कट्टर हिंदुत्ववादी श्री. मनोज खांडेकर यांनी दिनांक 03/10/2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज मुरुड विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षम आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल 150 ते 200 युवा कार्यकर्त्याना सोबत घेऊन जाहीर प्रवेश केला.
या भव्यदिव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमाला अलिबाग तालुक्यातील हेम नगर येथील जिल्हाप्रमुख राजा केणी तसेच रोहा तालुका प्रमुख एडवोकेट मनोज कुमार शिंदे युवासेना रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे उपस्थित होते.
ऐनघर ग्रामपंचायतीवर वर्षानुवर्ष या सर्व युवा पिढीच्या साथीने एक हाती शिवसेनेचीच सत्ता असून मनोज खांडेकर तसेच त्यांचे सहकारी यांच्या सध्याच्या परिस्थितीत शिंदे गट प्रवेशाने नक्कीच येत्या कालखंडात शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याचे संकेत दिसत आहेत मंदार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली पाटणसई ग्राम पंचायत मधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला युवा नेतृत्व मनोज खांडेकर यांनी भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी मध्ये यश संपादन करण्यासाठी जोमाने कार्यरत राहून शिवसेना शिंदे गटासाठी काम करणार असल्याचे मनोज खांडेकर यांनी आपल्या भाषणात शिवसेना शिंदे गट प्रवेश कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांसमोर सांगितले.
त्यावेळी नागोठणे विभागाचे उपविभाग प्रमुख आकाश मढवी प्रवीण ताडकर अमित खामकर रोशन उंबरे,विठ्ठल कदम प्रदीप पवार असे अनेक शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment