Press "Enter" to skip to content

दगडूशेठ ते शिरगाव साई पादुका पायी पालखी सोहळा संपन्न

सिटी बेल ∆ शिरगाव ∆ सुनिल ठाकूर ∆

साला बाद प्रमाणे श्री साईबाबा संस्थान शिरगावच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ गणपती ते शिरगाव एकदिवस पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

रविवार सकाळी 10.00 वाजता श्री साई मंदिराचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालाचंदानी यांच्या हस्ते साई पादुकांचा अभिषेक करण्यात आला. साई रथाचे पूजन उद्योजक दादासाहेब पोकळे, उद्योजक शिवाजी धनकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

पालखीत बॅंड पथक, घोडे, उंट, यांच्यासह हजारो भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर लक्ष्मी रोड मार्गे पालखीचे प्रस्थान करण्यात आले. ठीक ठिकाणी पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालखी रथाची आकर्षक अशी फुलांनी केलेली सजावट भाविकांना अधिकच आकर्षित करत होती.

दुपारी दीप बंगला चौक येथील सिमबायोसिस कॉलेजमध्ये कॉलेजचे संस्थापक शा. बा. मुजुमदार, संजवणी मुजुमदार यांच्या हस्ते मध्यान्ह आरती संपन्न झाली यावेळी प्राचार्य व विश्वस्त स्वाती मुजुमदार यांच्यासह कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी पालखीचे जंगी स्वागत केले. येथे पालखीतील सर्व सहभागी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

पालखी मध्ये उमरगा, मुळज, बोरी, बार्शी, करमाळा, राशीन, सराठी, पंढरपूर आदी ठिकाणांहून मोठया प्रमाणात साई भक्त पालखीत सहभागी झाले. सायंकाळी 6.30 वाजता पालखीचे शिरगाव साई मंदिरात फटाके वाजवत व फुलांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले.
पालखी यशस्वी नियोजनासाठी मंदिराचे विश्वस्त रवी जाधव, विभावरी जाधव, डिंपल लालचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली पालखचे सोहळ्याचे व्यवस्थापक राकेश मुगळे, पंढरपूर पालखी दिंडी क्र 1 चे प्रमुख संजय पवळे, अनिल कंधारे, देवेंद्र हलगुडे, लीला मोडक, धनाजी जाधव, भरती इंदुलकर, कविता पवळे आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.