Press "Enter" to skip to content

ऐनवहाल येथील सामाजिक सभागृहास राष्ट्रवादी कडून 10 लाखाचा निधी

सिटी बेल ∆ कोलाड नाका ∆ शरद जाधव ∆       

रोहा तालुक्यतील ऐनवहाल येथील सामजिक सभागृहास सुमारे 10 लाखाचे निधीचे पत्र माजी पालकमंत्री आमदार अदिती तटकरे यांच्या हस्ते ग्रामस्थाना सुपूर्द करण्यात आले.             

ऐनवहाल हे एक अध्यात्मिक गाव आहे. या ठिकानी ग्रामस्था तर्फे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. गावमधे विविध विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाली आहेत. तरी गावमधे भव्यदिव्य सामाजिक सभागृह असावे. अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे केली होती. या मागनिची दखल घेत सुमारे 10 लाख रुपये मंजुर केले. व निधीचे पत्र माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याहस्ते ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले.                  

यावेळी ग्रामस्थ रामदास खामकर, राजू खामकर, दिपक धामणसे, ग्रामस्थ मुंबई कर मंडळ उपस्थीत होते.                  

कोलाड खांब  विभागात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून पाणी, वीज ,रस्ते, व गावच्या मंदीरांचे शुशोभीकरण होत आहेत.विकासाच्या बाबतीत गावे सुजलाम दिसत आहेत. ग्रामीन जनतेची  कामे करणारे लोकप्रतिनिधी हे  तटकरे परिवाराच्या माध्यमातून मिळाले असल्याने या विभागात राष्ट्रवादीची तटबंदी मजबूत आहे      

निधी आणणे, विकास करणे, जनतेची  कामे करणे सतत तलागालातील लोकांच्या संपर्कात रहाणे.प्रशांसनातील कौशल्य ही कामे खासदार सुनिल तटकरे, आमदार आदितीताई व आमदार अनिकेत भाई यांनिच करावी. आज तरुणाई मधे अदितीताई व अनिकेतभाई आशेचे किरण ठरलेत अशी प्रतिक्रीया युवा कार्यकर्ते दिपक धामणसे यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.