Press "Enter" to skip to content

पेणमध्ये नवरात्रोत्सवाचा जागर

नवसाला पावणारी आई कोंबडपाडा वासिनी

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

राज्यात आजपासून सगळीकडे नवरात्रोत्सवाचा जागर सुरू झाला असून मागच्या दोन वर्षांत कोरोनामुळे सणांवर विरजण पडले होते.यात्र यावर्षी शासनाने सण उत्सवात साजरे करण्याचे आदेश दिल्यामुळे पेण शहरातील श्री गणेश मित्र मंडळ कोंबडपाडा यांच्या वतीने धूम धडाक्यात आणि भक्तिमय वातावरणात या नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी पेण शहरातील आई कोंबडपाडा वासिनी हिच्या दर्शनासाठी रायगड जिल्ह्यातील अनेक भाविक गर्दी करत आहेत.पेण शहरातील सर्वात उंच मूर्ती असलेली आई कोंबडपाडा वासिनी हिचा उत्सव नऊ दिवस विविध सामाजिक कार्यक्रमातून साजरे होणार आहे.

पहिल्या दिवशी स्थापना करून आरती ,भजन त्यानंतर हळदी कुंकू, महाआरती, दांडिया, फनिगेम्स, होम मिनिस्टर, फॅन्सी ड्रेस असे विविध कार्यक्रम होणार आहेत.यात शेवटच्या नवव्या माळेला होम त्यानंतर दसऱ्याला सत्यनारायणाची महापूजा आणि येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद याची व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.आई कोंबडपाडा वासिनीची विसर्जन मिरवणूक पेण शहरात मोठ्या दिमाखात भव्य दिव्य स्वरूपात काढली जाते मिरवणूकीत बॅन्जो पथक, डी जे तसेच फटाक्यांच्या आतेषबाजीने कोंबडपाडा आळी पासून चावडी नका, महात्मा गांधी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबिका मंदिर, कुंभार आळी, नंदीमाळ नाका, गांगळ आळी यासर्व ठिकाणाहून शेवटी कासार तलाव येथे भक्तिमय वातावरणात विसर्जन केले जाते.

सदर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शिगरूत, सदस्य म्हणून अतुल पाटील, रविंद्र बांधणकर, अरविंद आंबोळकर, मंगेश नाईक, संतोष भोसले, महेश नाईक, दिपक पवार, भाऊ पवार, गुरुनाथ मांजरेकर, भालचंद्र फाटक, रविंद्र विचारे, उत्सव कमिटी अध्यक्ष किरण बांधणकर , गणेश पवार, सचिन शिंगरुत, कुणाल बिराजदार, भूपेंद्र बांधणकर, दिनेश विचारे, ऋषभ पावले, पवन म्हात्रे, मंदार म्हात्रे, तन्मय डापसे, बंटी पोहेकर, मंगेश वाडकर, निलेश गुजर, सारंग पवार, सचिन भोसले यासह महीला मंडळ आदि सहकारी यासाठी मेहनत घेत आहेत.

कोंबडपाडा येथील श्री गणेश मित्र मंडळाचे यंदा ३२ वे वर्ष असून यावर्षी देखील ८ फूट उंच देवीची मूर्ती आहे.देवीची मुर्ती किरण गुरव तसेच मूर्तीचे रंगकाम सिद्धार्थ राठोड प्रथमेश म्हात्रे, जितेंद्र गायकवाड प्रफुल्ल पाटील यांनी केले आहे.अनेक भक्त नवसाला पावणाऱ्या आणि हाकेला धावणाऱ्या आई कोंबडपाडा वासिनीच्या दर्शनासाठी येत असतात मंडळाकडून भाविकांचे स्वागत करण्यात येत आहे.
# प्रकाश शिंगरूत – अध्यक्ष

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.