सिटी बेल ∆ धाटाव ∆ शशिकांत मोरे ∆
आज आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या मुहूर्तावर रोह्यातील धाटाव गावचे ग्रामदैवत श्री सोनारसिद्ध महाराजांची असंख्य ग्रामस्थांच्या साक्षीने श्री. सोनारसिद्ध महाराजांच्या जयघोषात धाटावचे उपसरपंच अशोक मोरे यांच्या शुभहस्ते भगवान श्री सोनारसिद्ध महाराजांची घटस्थापना करण्यात आली.दरम्यान झालेल्या स्थापनेने आज पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. याप्रसंगी गावातील वातावरण भक्तिमय झाले होते तर ग्रामस्थांमधेही उत्साह पहावयास मिळाला.
आज सोमवार दी.२६ सप्टेंबर रोजी दू.१२:३० अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या मुहूर्तावर धाटाव गावचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री सोनारसिद्ध महाराजांची उपसरपंच अशोक मोरे यांच्या शुभहस्ते देवाची घटस्थापना करण्यात आली.भगवान श्री सोनारसिद्ध महाराज की जय अशा जयघोषात प्रकाश जंगम यांनी केलेल्या विधिवत पूजाअर्चा महाआरती झाल्यानंतर ग्रामदेवत आज घटी बसविण्यात आले.मंदिरात ग्रामस्थानि केलेल्या सोनारसिद्ध महाराजांच्या जयघोषाने सबंध परिसर दणाणुन गेला होता.यासमयी धाटावचे माजी उपसरपंच यशवंत रटाटे,चद्रकांत मालुसरे,खेलु रटाटे,नयन रटाटे,किशोर रटाटे,केशव भोकटे,रमेश भोकटे, महादेव रटाटे,सूर्यकांत मोरे,रूपेश रटाटे,केशव भोकटे,पोलिस पाटिल कृष्ना रटाटे,गणेश म्हसकर,संतोष रटाटे,संजय भोकटे,चंद्रकांत भोकटे, महेंद्र रटाटे,सचिन रटाटे,शाम भोकटे, विनय भोकटे,महेंद्र जंगम,भाऊ शेळके,यांसह गाव कमिटी,जेष्ठ नागरिक, गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान ग्रामदेवतेच्या नावाचा फलक मंदिराच्या मुख्य दरवाजावर लावण्यात आला. मंदिराला चहूबाजूने रोषणाई करण्यात आली होती,तर सर्वत्र विविध रंगाच्या पताकांनी सजावट केल्याचे पहावयास मिळाले. मंदिरात ग्रामदैवतेच्या घटस्थापना कार्यक्रमाला मोठ्या श्रध्देने,मनोभावे गावातील जेष्ठ,श्रेष्ठ मंडळीसह तरुण वर्गाचा व महिलांचा सक्रीय सहभाग आणि उत्साह आनंद घेणारा होता.
Be First to Comment