Press "Enter" to skip to content

जोहेचा राजाची महाआरती दादर सागरी पोलिसांच्या हस्ते

सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆

संपूर्ण देशात गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यातील जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेचा राजाची स्थापना करण्यात आली आहे. जनतेच्या सुरक्षेची काळजी घेताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या दादर सागरी पोलिसांच्या हस्ते यावेळी बाप्पाची महाआरती संपन्न झाली.

वर्षभर गणेश मूर्ती बनविण्यात मग्न असणारे पेण तालुक्यासह जोहे गावातील जेष्ठ, महिला व युवा वर्ग मात्र या श्रीगणेश चतुर्थी गणेशोत्सव झाल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला विशेषतः पेण, पनवेल, उरण आदी तालुक्यात घरगुती व सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साखरचौथ गणपती सण साजरा करतात २०१३ साली स्थापन झालेल्या या साखर चौथ गणेशोत्सवात शाळेय विद्यार्थी दत्तक घेणे, महिलांसाठी वेगवेगळे शिबीर, रक्तदान शिबिर आयोजित करणे आदी सामाजिक कार्य करण्यात येत आहे. जोहेचा राजा प्रतिष्ठान तर्फे गणेश मूर्तीचे हब म्हणून ओळख असलेल्या जोहे गावात दरवर्षी प्रमाणे पाच दिवसांसाठी साखरचौथ गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.

कोणताही सण असल्यावर जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या व धार्मिक कार्यात आपल्या कुटुंबापासून नेहमी दूर असणाऱ्या दादर सागरी पोलीस स्टेशनला जोहेचा राजाच्या महाआरतीचा मान देण्यात आला होता. यावेळी उप पोलीस निरीक्षक के.आर.भऊड, रवी मुंडे व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते व शेकडो भक्तांच्या उपस्थितीत बाप्पाची महाआरती करण्यात आली. दरम्यान प्रतिष्ठान कडून गायक संतोष पाटील यांच्या संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी भाजप युवा नेते वैकुंठ पाटील, नगरसेवक निवृत्ती पाटील, भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील, समाजसेवक दत्ता कांबळे, युवा नेते विवेक जोशी, शेकापचे माजी सरपंच काशिनाथ पाटील, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, गोपीनाथ मोकल, साज मराठी निर्माते सुनिल पाटील, जोहेचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक देवा पेरवी, अध्यक्ष नारायण म्हात्रे, वैभव धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र रसाळ, कार्याध्यक्ष विनोद म्हात्रे, दीपेश पाटील, रुपेश पाटील, कमलाकर बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.