नागोठणे येथील मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन दिनी गणेश भक्तांचे गुलाब पुष्पाने केले स्वागत
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆
नागोठणे येथे अंबा नदीच्या काठावर गावातील गणेश भक्तांनी जोरदार भरपाऊसात गणेश विसर्जनासाठी गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक काढली होती त्या विसर्जन मिरवणूक मध्ये ढोल ताशे बॅनजाॅ डीजेच्या गजरात व फटाकाच्या आतषबाजीने विसर्जन मिरवणूक कुंभार आळी मराठा आळी गवळ आळी मधून काढण्यात आली होती.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्व गणेश भक्तांचे नागोठणे येथील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी गुलाब पुष्पगुच्छ व थंड पेय देऊन स्वागत केले. स्वागता वेळी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लियाकत कडवेकर, शब्बीर पानसरे, नजीर पानसरे, नागोठणे जिल्हा शांतता कमिटी सदस्य अशपाक पानसरे, पंचायत समिती माजी सदस्य बिलाल कुरेशी, पत्रकार याकूब सय्यद, युवा कार्यकर्ते सद्दाम दकेदार, आसिफ मुल्ला, समीर भिकन, आदिल पानसरे, शाहिद सय्यद, मन्सूर सय्यद, इम्रान पानसरे, दानिश अधिकारी, हुसेन पठाण, शिराज पानसरे, वसीम बोडरे, इम्तियाज दफेदार, कु. हाशमी सय्यद तसेच अनेक मुस्लिम बांधव खुमाचा नाका येथे मोठ्या संख्येने गणेश भक्तांचे स्वागतासाठी उपस्थित होते.








Be First to Comment