सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
गणेशोत्सवानिमित्त बुधवार दिनांक 31 ऑगस्ट 2022 ते शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत ग्रामपंचायत तुराडे यांच्या वतीने मखर आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेला आपल्या गावातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
त्याप्रमाणे तुराडे ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच चंद्रकांत भोईर,उपसरपंच भाऊ ठाकूर, माजी उपसरपंच मनोहर चव्हाण, माजी उपसरपंच विश्वनाथ गायकवाड, आणि माजी उपसरपंच हर्षल पाठारे यांनी संपूर्ण तुराडे गाव,आणि कष्टाकरीनगर येथील गणपतीचे दर्शन व पाहणी करून पर्यावरणपूरक मखर, शुशोभिकरण, स्वच्छता आरास सोबतच स्वच्छ परिसर व सांस्कृतिक वारसा आपल्याकडून या कालावधीत मोठ्या प्रमाणात जपला गेला. या सर्वांचे निकष काढून नंबर काढण्यात आले. त्यामुळे यावर्षी थर्माकोल चा वापर नगण्य होता. एक ग्रामपंचायतीचा हेतू साध्य झाला. यापुढे सर्व गणेश भक्तांनी पर्यावरणाचा समतोल राखून सामाजिक बंधुभाव, राखवा असे सूचित करण्यात आले.आपण सर्वांचे मखर आरास अतिशय सुरेख होती . ग्रामपंचायत तुराडे कडून आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
पंच कमिटीने या स्पर्धेचे पहिले तीन क्रमांक खालील प्रमाणे निवडलेले आहेत.
प्रथम क्रमांक – श्री. सतीश लक्ष्मण ठाकूर, द्वितीय क्रमांक – श्री. जितू सुरेश दळवी, तृतीय क्रमांक- श्री. आणि रघुपती पाटील
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन विजेत्यांना ग्रामपंचायतीकडून आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.तसेच तुराडे कष्टकरी नगर मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कष्टकरी नगर ,जय हनुमान सामाजिक विकास मंडळ कष्टकरी नगर व जय दुर्गा माता विकास मंडळ कष्टकरी नगर यांच्याकडून बुधवार दिनांक 31 ऑगस्ट 2022 ते शुक्रवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला गेला. गणेशोत्सवासोबतच या मंडळांनी रक्तदान शिबिर व इतर सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे ग्रामपंचायत तुराडे कडून या मंडळांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.








Be First to Comment