Press "Enter" to skip to content

उरण मधील वादन एक कला ढोल ताशा पथकाचा पहिला पर्यावरण पूरक गणपती

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

पर्यावरणाचा व निसर्गाचा बाप्पा अशी वादन एक कलाचा राजाची ओळख आहे.टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंनी बनवलेला आकर्षक देखावा कामगार वसाहत उरण शहर येथे पहावयास मिळते. असा पर्यावरणपूरक देखावा सादर करणारा उरण नवी मुंबई मधला ढोल ताशा पथकापैकी हा पहिला पथक आहे.

पथक प्रमुख ओमकार घरत,अध्यक्ष तेजस मनोहर म्हात्रे,सदस्य-आकाश तेलंगे,राज पाटील,हर्ष पाटील,सिद्धेश घरत,केतक घरत,प्रणय पाटील,क्वींतन फर्नांडिस,सागर शाह,ध्रुमिल पारेख, दिपेश म्हात्रे,निखिल पाटील,गणेश बंडा,चेतन माळी,मयूर केकटपुरे,सुमित तांबोळी,हर्षद कांबळे,अवलोंन फर्नांडिस,सुभाष चक्राबोर्ती,मक्सन रोड्रिक्स,राज म्हात्रे यांनी सदर गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

वादन एक कला पथक उरण या पथकाची स्थापना 2016 साली झाली.पथकाचे अध्यक्ष व पथकाचे सल्लागार ओमकार घरत आणि गणपती मंडळाचे अध्यक्ष तेजस म्हात्रे या उरण मधील वादन एक कला पथकांतील तरुण युवकांनी एकत्र येत गणपतीच्या देखाव्यात वादन कलाकाराची कला साकारत पर्यावरण पूरक अशी गणेशोत्सवाची सजावट केली आहे.कागद,पुठ्ठे,कापूस,झाडाच्या फांद्या व झाडाची पाने या पर्यावरण पूरक वस्तुंचा वापर करून सजावट करण्यात आलेली आहे.

वादन एक कला ढोल ताशा पथक उरण नवी मुंबई यांनी उरण मध्ये साकारलेल्या या पर्यावरण पूरक गणेशोत्सवामुळे नागरिकांनी या गणपतीचे मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले आहे.दिनांक 14/9/2022 रोजी लहान मुलांचे खेळ व फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वादन एक कला ढोल ताशा पथकातर्फे करण्यात आला आहे.

More from गणेशोत्सव २०२२More posts in गणेशोत्सव २०२२ »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.