पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कटिबद्ध — वैकुंठ पाटील
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा रक्तदान शिबिर साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने पेण शहरातील जैन समाज हॉल येथे या शिबिराला असंख्य रक्तदात्याने रक्तदान केले.
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, भविष्यात यापुढे देखील मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटिबद्ध असून त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण देशभरात होत आहे.गोर गरीबांसाठी अनेक योजना त्यांनी आणल्या आहेत.त्याचा योग्य उपयोग होत असल्याचे वैकुंठ पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिबिरादरम्यान पेण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हेमेंद्र जैन, नगरसेवक दर्शन बाफना, युवा नेते ललित पाटील, महेश भिकावले, शेडाशी सरपंच प्रकाश कदम, केंद्रीय हेल्थ अँड केअर वेल्फेअर, अखिल भारतीय तेरा पंथ युवक परिषद, कच युवक संघ, धर्मेंद्र जैन, राकेश जैन, धनेश शहा, संदिप पूनामिया, हर्षल पुनामिया, अमित पूनमिया आदि उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करत असताना यामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, स्वच्छ्ता, आरोग्य शिबीर, विविध प्रकारच्या शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे, बुद्धाजीवी सम्मेलन, स्वच्छ भारत अभियान आदी सेवाभावी कार्यक्रम येत्या पंधरवड्यात करण्याचा संकल्प रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
Be First to Comment