Press "Enter" to skip to content

विनोबा जयंती साजरी

गांधी व विनोबांचे विचारच देशाला तारू शकतील – ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शंकर बगाडे

सिटी बेल ∆ पनवेल ∆

सर्वोदय व ग्राम स्वराज्य समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भानघर येथील सर्वोदय आश्रम येथे विनोबा जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी बोलताना ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शंकर बगाडे म्हणाले की हिंसेने प्रश्न कधीच सुटणार नाही आपल्याला अहिंसा ही जीवनात आणावीच लागेल, तसेच जात, धर्म, पंथ, भाषा हे सर्व भेद सोडून आपल्याला एकत्र येऊन समाजात परिवर्तन घडवायला लागेल. तरच समाज बदलू शकेल यासाठी आपल्याला गांधी व विनोबा यांचे विचारच मार्गदर्शक ठरतील व तेच विचार आपल्या समाजाला तरी शकतील.

11 सप्टेंबर ला विनोबा जयंती असते त्यानिमित्ताने सर्वोदय आश्रम भानघर येथे दोन दिवसाचे कार्यकर्त्यांचे शिबिर घेण्यात आले. त्यास सुमारे 40 कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते व राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी अनुप कुमार पांडे यांनी विनोबांच्या कामाचा आढावा घेताना भूदान चळवळ व ग्रामदान चळवळ याबद्दल माहिती दिली.

गांधी विचारांचे अभ्यासक व कृती करणारे कार्यकर्ते संकेत मुनोत पुणे हे या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आज समाजात महात्मा गांधी यांच्या बद्दल काही लोक व प्रतिगामी संघटना जाणीवपूर्वक विष पसरवत आहे.चुकीचे विचार समाजात मांडून गांधीजींची प्रतिमा मलिन करीत आहे. त्यांनी गांधी आधी समजून घ्यावा तसेच गांधीं बद्दल समाजात जे आक्षेप पसरवले जात आहे त्याची सत्यता सर्वांनी पडताळली पाहिजे. तसेच ते म्हणाले की जगभरामध्ये आज अनेक लोक गांधी विचारणे प्रेरित होऊन समाजात परिवर्तनाचे काम करत आहेत. आपल्या शासनकर्त्यांना सुद्धा जगामध्ये गेल्यानंतर गांधींचेच नाव घ्यावे लागते हे गांधी विचाराचे यश आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन शंकर बगाडे अल्लाउद्दीन शेख यांनी केले होते. त्यास संजय गायकवाड, नीतू गायकवाड, मीना पालांडे, संतोष ठाकूर, उदय गावंड, राजेश रसाळ, सुशीला वामन, सुनीता भगत, फातिमा सदावर्ते, रंजना पाटील, तुळशीराम पाटील, डॉ.चॅम्पियन बेंडले, जयवंत पाटील, अविनाश पाटील अरुण पालांडे, उज्वला सांगडे, चंदा कातकरी, कृष्णा सांगडे व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.