कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली एकाच दिवशी दोन कंपन्यात पगारवाढीचे करार
सिटी बेल ∆ कामगार प्रतिनिधी ∆
कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. समाजात आपल्यासोबत असणाऱ्या सर्वांचा, मग ते सहकारी असो, मित्र असो, नातेवाईक असो किंवा सर्वसामान्य कामगार असो, सर्वांचा विकास झाला तर त्यांच्या आशीर्वादाने परमेश्वर आपल्यालाही भरभरून देतो असा त्यांचा विश्वास.
कामगार नेते महेंद्र घरत हे 160 कंपन्यातील 12000 कामगारांचे नेतृत्व करत आहेत. संघटनेमार्फत दरवर्षी 18 ते 20 पगारवाढीचे करार केले जातात, वर्षभरात 10 ते 15 नवीन कंपन्यांतील कामगार त्यांचे नेतृत्व स्वीकारत असतात. त्यांचे वैशिष्ठ म्हणजे जोपर्यंत शेवटचा कामगार समाधानी होत नाही तोपर्यंत करारावर सह्या करत नाहीत.
दिनांक 13 सप्टेंबर रोजी मे. लॅबगार्ड इंडस्ट्रिज पेण मधील कामगारांना तीन वर्षासाठी रुपये 9000/-व मे. अष्टे लॉजिस्टिक( CFS )पळस्पे पनवेल मधील कामगारांसाठी तीन वर्षासाठी रुपये 8000/-पगारवाढ करण्यात आली. त्याच बरोबर बोनस, कामगारांच्या परिवारासाठी मेडिक्लेम पॉलिसी व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले.
या करारनाम्या प्रसंगी NMGKS संघटनेचे अध्यक्ष-कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष -पि.के.रमण, सरचिटणीस -वैभव पाटील, तसेच लॅबगार्ड कंपनीचे ऑपरेशन डायरेक्टर अजय कणेकर, कामगार प्रतिनिधी सुभाष पाटील, प्रमोद पाटील, निलेश पाटील, दत्ता पाटील, निलेश टेमघरे, प्रदीप पाटील तर अष्टे लॉजिस्टिक कंपनीचे ऍडमिन म्यॅनेजर कांतीलाल पाटील, कामगार सुभाष पाटील, हेमंत पाटील, सुरेंद्र पाटील, विलास लबडे, रेवनाथ नाईक, गणेश घरत, गुरुनाथ मते, राम मते, पाडुरंग पैर, अरुण म्हसकर उपस्थित होते. दोन्ही कंपन्यांनातील कामगारांनी पगारवाढीबद्दल संघटनेचे आभार मानले.
Be First to Comment