सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
दीड आणी पाच दिवसाच्या गणपती विसर्जनास वरून राजाने हजेरी लावल्यामुळे गणेश भक्तांची तारांबळ उडाली होती.मात्र आज अनंत चतुर्दशी चे गणतीचे विसर्जन होणार यामुळे सार्वजनिक मंडळे आणी घरघुती मंडळाची जयत तयारी सुरु होती पावसाचे अगमन केव्हा होईल यांची शास्वती नव्हती सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या घरी विराजमान झालेल्या दहा दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल तासे सज्य झाले होते. काही सार्वजनिक मंडळाने महिनाभर अधिच ढोल ताशे बुक केले होते.यामुळे भक्तांचा उत्साह ओसांडून वाहत होते.
अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठीक – ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. ठिकाणी गणपती विसर्जनाची तयारी सुरु होती.कारण पाऊस केव्हा येईल यांची शास्वती नव्हती यामुळे विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी लहान मुले ते वृद्ध या ठिकाणी एकत्र आले होते. मिरवणुकीत लहान मुले ढोल ताश्यांच्या ढेक्यावर नाचण्यासाठी तल्लीन झाली होती.आरत्या आणि गाण्यांच्या तालावर बाप्पाला निरोप द्यायला निघालेल्या भक्तांना वरुण राजाने गाठले. परिणामी चारचाकी हातगाड्या आणि डोक्यावर गणपतींच्या मूर्ती घेऊन जाणार्या भक्तांची आणि चिमुरड्यांची धावपळ उडाली. जागा मिळेल तिथे भक्त आडोसा शोधत होते, तर काहींनी प्लास्टिकचे छत आणि छत्र्यांच्या आधारे बाप्पांच्या मिरवणुकीत खंड पडू दिला नाही.

बाप्पाच्या आगमन सोहळ्य़ाला ढोल पथकांना मागणी असून बेंजोच्या तालावर तरुणाईसोबत ज्येष्ठ आणि चिमुरड्यांनीही ठेका धरला होता. काही ठिकाणी राजकीय पक्षांनी डीजेचा दणदणाट केला होता. टाळ-मृदुंगांच्या तालावर भजन म्हणत गणरायाला निरोप देण्यात आला. त्यानुसार विसर्जनापूर्वीची महाआरतीदेखील एकत्रितच घेऊन म्हटली गेली. गणरायाच्या विसर्जनाला पावसाने हजेरी लावल्यामुळे ढोल-ताशाच्या तालावर नाचणार्या गणेशभक्तांच्या उत्साहावर विर्झन पडले होते,मात्र गणेश भक्तांनी मोठ्या उत्सहाने विसर्जन केले यावेळी तुकाराम जाधव,जनार्धन जाधव,आत्माराम जाधव,पि.के जाधव, अरुण जाधव,सूर्यकांत रा. जाधव,राजु पाटील,सुधीर भोईर,अरुण भोईर,गजानन जाधव,शांताराम जाधव,पंकज स.जाधव,अदि गणपती विसर्जनास सहभागी झाले होते.








Be First to Comment