सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत पोलीस ठाण्याच्या गणरायाचे अकराव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.ब्यांजोच्या वाद्यात गणरायाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली होती.
दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो त्यावेळी पोलीस कर्मचारी बंदोबस्ताच्या ठिकाणी असतात त्यामुळे ते आपल्या घरी गणेरायाची स्थापना करू शकत नाहीत. पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात गणेशा ची स्थापना करून दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा आर्चा करतात. दहा दिवसांच्या गणेरायाचे विसर्जन झाले की बंदोबस्तातुन मोकळे झाल्यावर अकराव्या दिवशी ते आपल्या गणरायाचे विसर्जन करतात.

मिरवणुकीत नाचत असलेले पोलीस कर्मचारी
पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या गणेरायाला आज दि.10 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक निघाली. पोलीस ठाण्यातुन निघालेल्या मिरवणुकी पूर्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नंतर वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, सतिश शिंदे, राजेंद्र मांडे,पत्रकार विजय मांडे यांच्या सह पोलिस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते. विसर्जन मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकमान्य टिळक चौक मार्गे मशिदीवरून गणेश घाटावर पोहचली.
विशेष बाब म्हणजे नेहमी पोलीस वर्दी मध्ये असलेले महिला व पुरुष पोलीस कर्मचारी आज पारंपारिक वेष भूषेत नाचत आपल्या गणरायाला निरोप देत होते.








Be First to Comment