सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
उरण चे आमदार महेश बालदी यांनी ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या निवास स्थांनी विराजमान झालेला गणपती चे दर्शन घेतले.आमदार यांचे आगमन होताच या परिसरातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गावतील काही समस्या तसेच विकास कामे यांच्या वर चर्चा झाल्यांचे समजते.

आमदार महेश बालदी हे सरपंच गोपीनाथ जाधव यांचे निकटवर्ती असल्यामुळे गावाच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशिल असून कोणतीही समस्या निर्माण झाल्यास ती पूर्ण करण्यासाठी ते अग्रेसर असतात. शिवाय प्रत्येकांच्या सुख : दुखात सहभागी होत असल्यांचे पहावयास मिळत आहे.तरुणांच्या मध्ये सहभागी होवून त्यांच्या उत्साह वाढविण्यात त्यांची भूमिका फार महत्वाची असल्यांचे पहावयास मिळते.
यावेळी तुकाराम जाधव,जनार्धन जाधव,जयेश पाटील,आत्माराम जाधव,रमेश वाळकु जाधव,रमाकांत जाधव,गजानन्न जाधव,विलास कांबळे,जयवंत पाटील,शिवाजी शिंदे,किरण शिंदे,सागर शिंदे,विनायक शिंदे,राहुल शिंदे अदि उपस्थित होते.








Be First to Comment