सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆
शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणजे अंकुश नथुराम जाधव . शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष श्री सतीश मोहन पाटील यांच्या न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली मध्ये गेल्या 18 वर्षे कार्य असणारे अंकुश जाधव आपल्या दिव्यांगावर मात करीत ज्ञानाची बाग फुलवण्याचे पवित्र कार्य अत्यंत प्रामाणिकपणे करीत आहेत. विद्यार्थी प्रिय असे अंकुश जाधव यांना आदर्श शिक्षक, काव्यरत्न, साहित्य भूषण ,ज्ञानभूषण ,शिक्षकरत्न आदी पुरस्काराने गौरविले आहे.
रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत शिक्षक दिनानिमित्त अंकुश जाधव यांचा सौ अवंतिका अंकुश जाधव सपत्नीक यथोचित सत्कार कळंबोली पोलीस निरीक्षक सीनियर पी आय संजय पाटील यांच्या हस्ते बिमा कॉम्प्लेक्स राजा गणेशोत्सव मंडप कळंबोली येथे करण्यात आला आला.
त्यावेळी उद्योजक रामदास शेवाळे अध्यक्ष बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सदाशिव जाधव साहेब, संदीप तरटे, खटके सर, आबाशेठ लकडे ,शरद कदम, सुरेश देवा दिघाडिया आदी मान्यवर उपस्थित होते .त्यांच्या सत्कारबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment