Press "Enter" to skip to content

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले गायकवाड कुटुंबियांचे सांत्वन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कर्जत तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड यांचे आकस्मित निधन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( आठवले गट ) कर्जत तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. त्यावेळी त्यांनी हिरामण गायकवाड यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिले.

रामदास आठवले किरवली मधील गायकवाड यांच्या निवसस्थानी आले. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, नगरसेवक राहुल डाळिंबकर आदी उपस्थित होते. आठवले यांनी गायकवाड कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. त्यांनतर किरवली येथील आंबेडकर नगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याला ‘किशोर गायकवाड मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर आठवले यांनी हिरामण गायकवाड यांना तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र दिले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, रायगड संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, नरेंद्र गायकवाड, तानाजी गायकवाड, कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड, उपाध्यक्ष नरेश गायकवाड, कर्जत शहराध्यक्ष अरविंद गायकवाड, प्रफुल्ल ढाले, नेरळ शहर अध्यक्ष दिनेश आढाव, प्रकाश गायकवाड नेरळ, राजेश आढाव, बाळा चंदनशिवे, माजी सरपंच गोटीराम गायकवाड आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.