नवसाला पावणारा पेण येथील यशवंत दादाचा राजा
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
पेणमधील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते यशवंतदादा घासे यांचा नवसाला पावणारा यशवंत दादाचा राजा हा इको फ्रेंडली म्हणून लालबागच्या राजाची प्रतिकृती विराजमान करण्यात आली असून गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील असंख्य गणेशभक्त त्यांच्या निवासस्थानी येत आहेत.

मागील अनेक वर्षे आपल्या परंपरेनुसार दहा दिवसांसाठी आपल्या निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करतात मात्र गेली दोन वर्षे कोरोना काळ असल्यामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही परंतु यावर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी त्यांनी इंको फ्रेंडली लालबागच्या राजाची प्रतिकृती उभारली.
यादरम्यान आपली सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी भजन, अभंग, किर्तन, हरिपाठ असे धार्मिक उपक्रमांसह महिलांची पारंपरिक गीते आणि लहान मुलांसाठी खेळ असे विविध कार्यक्रम यावेळी राबविले.तर विसर्जना दरम्यान पेण ते दादर खाडी पर्यंत भव्य मिरवणूक काढून यशवंत दादाच्या राजाचे ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीत पारंपारिक पद्धतीने विसर्जन करण्यात येणार असल्याचे यशवंत दादा घासे यांनी सांगितले.








Be First to Comment