सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
गौराईचे अगमन झाल्यावर दुस-या दिवशी महीलावर्गांनी भक्ती भावाने ओवसा दिला.गौरी-गणपती सण तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असल्यामुळे या दिवशी महिलांची विशेष करून लगबग पहावयास मिळाली.माहेर वासिंनी ओवसा देण्यासाठी विवाहीत महिलांनी नववारी वस्त्र परिधान करून नाकात नथ आणी विविध प्रकारचे अलंकार परिधान करुन आणी साज शुंगार ने ओवसा देण्यात आला.
ओवस देण्यासाठी माहेर हून आलेल्या बाबूंच्या काठी पासून बनवलेल्या सूप पूजेसाठी वापरता आले.त्याच बरोबर या मध्ये पाच फळे आणी तांदळाच्या पीठाचे बनविलेले दिवे -भंडार सुपामध्ये ठेवून या लाडक्या गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली.घरात सुख -शांती लाभावी आणि मंगल वातावरण निर्माण व्हावे,या साठी महिला या गौरीची पूजा करण्यात आली. पारंपारिक गौराई गीताच्या स्वराने हा परिसर जणू भक्तिमय झाले होते.यामुळे या दिवशी सर्वत्र ठिकाणी चैतन्य निर्माण झाले होते.अशा भक्तीमय वातावरण गौराईला ओवसा देण्यात आला.
Be First to Comment