Press "Enter" to skip to content

६३ वर्ष भजन सेवा

चौक वावंढळ येथील कोयना प्रकल्पग्रस्तांनी जपली परंपरा

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

कोयना प्रकल्पग्रस्त जनतेने सातारा जिल्हा पुनर्वसना मुळे सोडला, पण ६३ वर्षांनी गणपती आगमनापासून रीती, परंपरा, संस्कृती, भजन पूजन कायम ठेऊन वारसा परंपरा कायम ठेवली आहे, सद्या याच श्रेय तरूण पिढीला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामुळे निराश्रित होऊन, स्वकर्तृत्वाने उभे राहिलेले खालापूर तालुक्यात जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती चौक येथे कै.जे.आर.तथा जयसिंगराव राजबाराव कदम यांच्या सूचक व दूरदृष्टीने वसले आहे. सद्याची वसाहत प्रकल्पग्रस्तानी स्वखर्चाने उभी केली आहे.चौक (वावंढळ) या गावाने ६३ वर्षांनी देखील आपली रूढी, परंपरा,संस्कृती वारसा परंपरा कायम ठेवली आहे.गणपती आगमन ते गणरायाला निरोप या दिवसात प्रत्येकाच्या घरी भजन हे होतच.अंदाजे १४४ घरवळ आहे.सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका असलेल्या कोयना जांब्रुक या गावात देखील भजन व्हायचे,असे साक्षीदार वयस्कर मंडळी सांगतात.जुन्या गावी वाडी वस्ती होती,प्रत्येक वाडीत साधारण दिड ते दोन किमी अंतर होते.

वाघ,अस्वल,कोल्हा,लांडगा,मोर, तरस यांचे दर्शन झाल्या शिवाय दिवस जात नसे.त्यावेळी रात्री उजेड हा प्रकारचं माहीत नव्हता.रात्रीच्या अंधारात जवकी(सतत पेटत असणारे वनस्पती झाड) च्या उजेडात लोक भजनाला एकत्र जमत असत. एखाद्याकडे बॅटरी असणं म्हणजे तो श्रीमंत.अशीच अख्यायिका होती.तीच परंपरा आजही वारकरी संप्रदाय बरोबर तरुण पिढी एकत्र येऊन सांभाळत आहे.या भजन कार्यक्रम बरोबर दोन मानकरी यांच्या घरी गौरी पूजनाच्या दिवशी गावचा देव रुपी च्या स्वरूपात येतो,त्याही ठिकाणी ही भजनी मंडळी जागर करीत असतात.

हभप.रविबुवा, मयुर, करण,मकरंद, प्रसाद,रोहित, हभप.अंकुषबुवा, हभप.येशवंतबुवा,दिलीप,नरेश,रोशन, अनंतदादा,जितू,प्रणित,नारायण,विजय यांच्यासह अनेकजण भजनी मंडळी जागर करीत असतात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.