Press "Enter" to skip to content

शिवसेनेच्या दणक्यानंतर कळंबोली  रिक्षानाका रस्ता दुरुस्तीचे काम सुरु

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

शिवसेनेच्या दणक्यानंतर कळंबोली येथील रिक्षा नाका रस्ता दुरुस्तीचे काम पनवेल महानगरपालिकेने काम सुरु केले आहे .
                          

कळंबोली येथील स्थानिक रिक्षाचालक स्टील मार्केट जीविका हॉटेल येतील रिक्षानाक्याची अत्यंत दुरवस्था झाली होती.त्यामुळे नागरीकांमध्ये सततच्या पावसामुळे सगळीकडे पाणीचपाणी झाले होते. त्यामुळे रिक्षा मालक तसेच रिक्षा प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या नेतृत्वाने तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी पनवेल महानगरपालिका प्रभाग (९) चे वार्ड आधिकरी कवठे यांची भेट घेऊन तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.

या वेळी दिलीप पाटील, उपविभागप्रमुख हिरामण भोईर, शहर सघटक अरविंद कडव, शहर सघटक विवेक गडकरी, शाखाप्रमुख राणा देवरमनी, शाखाप्रमुख काशीनाथ पाटील, उपशाखा प्रमुख प्रदिप पाटील व रिक्षामालक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यावेळी प्रभाग अधिकारी कवठे यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करतो असे यावेळी सांगितले. त्यानुसार रिक्षा नाक्याची दुरुस्ती पनवेल महानगरपालिकाने सुरु केल्याने तालुकाप्रमुख विश्वास जगन्नाथ पेटकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.