Press "Enter" to skip to content

विद्या मंदिर मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदीअँड.सतींद्रनाथ शंकर फडकर यांची निवड

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

मुंबईच्या माहीम भागात मुख्य कार्यालय असलेल्या विद्या मंदिर मंडळ संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली त्यात गेली चाळीस वर्ष या संस्थेच्या विविध पदावर काम केलेले अनुभवी फडकर यांची अध्यक्षपदी निवड झाली.

या निवडणुकीत खालील पदाधिकारी निवडून आले आहेत. अध्यक्ष – अँड. सतींद्रनाथ फडकर, कार्याध्यक्षा – सीए शशिकला मुळ्ये, कोषाध्यक्ष – सुरेश देशमुख,उपाध्यक्ष – अरुण धारप, उपाध्यक्ष-अनघा मथुरे, संयुक्त कार्यवाह – विवेक पोतदार,संयुक्त कार्यवाह – चंद्रशेखर देशमुख, विश्वस्त- मनोहर हर्डीकर,डॉ. भरत लाड, भरतकुमार मेहेता,डॉ. मिलिंद पोतदार,वसंत सुळे कार्यकारी मंडळ सदस्य- सुशांत बदले,दिलीप गडकरी,अर्चना खळे, रमेश कुंभार, सुहास मोकाशी,विलास प्रधान, निलेश वैद्य, स्विकृत सदस्य -सुरज कामथे व सोनल पाटील,अंतर्गत हिशेब तपासनीस-सुनील जगताप व श्रीनिवास वैद्य हे आहेत.

विद्या मंदिर मंडळ हया संस्थेची माहीम (मुंबई)येथे शाळा असून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथेही शाळा तसेच महाविद्यालय आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.