Press "Enter" to skip to content

शिवसेनेत इनकमिंग सुरुच

पळस्पे ग्रामपंचायतील आजी-माजी सदस्यांचा आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्याने प्रभावित होऊन उरण विधानसभा मतदारसंघातील पलस्पे ग्रामपंचायतील आजी-माजी सदस्य संतोष खांडेकर, प्रवीण गणेश ठाणगे व गौरव संतोष खांडेकर यांनी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनाभवन येथे शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून व भगवी शाळ देऊन शिवसेनेत स्वागत केले.यावेळी नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, पलस्पे शाखाप्रमुख संदिप पाटील, द्रोणागिरी उपशहरप्रमुख प्रतीक पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.