सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
पनवेल शिवसेना शहर शाखेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त शिव सहाय्य पनवेलच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी अपघाती विमा योजना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण अंतर्गत भारतीय टपाल(पोस्ट ऑफीस) सेवेची 399 रुपयांची अपघाती विमा योजना जास्तीत जास्त नागरीकांपर्यत्त पोहचवण्याच्या उद्देशाने सदर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शिवसेना शाखेत करण्यात आले आहे. यावेळी टपाल खात्यातील 3 कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी या ठिकाणी भेट देऊन या योजनेची माहिती घ्यावी तसेच सोबत पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅनकार्डचे झेरॉक्स घेऊन यावे. सदर कार्यक्रमसकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत्त सुरु राहणार असल्याची माहिती शहर प्रमुख प्रविण जाधव यांनी दिली आहे.
Be First to Comment