Press "Enter" to skip to content

“काव्य-दरबार… कवी-संमेलन “

“काव्य-दरबार” आयोजित ७१ व्या कवी – संमेलनाचे आयोजन

सिटी बेल ∆ उरण ∆

“काव्य – दरबार” आयोजित ७१ व्या कवी- संमेलनाचे आयोजन चिर्ले-उरण येथील कवी-साहित्यिक के. एम. मढवी यांच्या निवासस्थानी करण्यात आले.

कवी-संमेलनात सर्वश्री. कवी– हरिश्चंद्र माळी. चिर्ले, जनार्दन पाटील. पेण-सोनखार, अरुण पाटील. पेण-रावे,  के.एम.मढवी. चिर्ले, प्रकाश ठाकूर. उरण-भेंडखळ, सी. बी. म्हात्रे. उरण-भवरा, हरिभाऊ घरत. भेंडखळ, अरुण द. म्हात्रे. जासई. अशा सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ मान्यवर कवींनी सहभाग नोंदवून विविध विषयांच्या स्वरचित बहारदार रचना सादर केल्या.

सदर कवी-संमेलन रिम-झिम पावसाचा आनंद घेत, हसत-खेळत, वैचारिक गप्पांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पडले. कवी संमेलनाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ कवी सी. बी. म्हात्रे यांनी मार्गदर्शनासह उत्तम भूषविले. ईशस्तवन आणि सूत्रसंचालन कवी-गायक- अरुण द. म्हात्रे यांनी केले. तसेच प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन कवी- प्रकाश ठाकूर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.