सिटी बेल ∆ रामकृष्ण पाटील ∆ नंदुरबार ∆
श्री.आप्पासाो.आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात ‘बहिण-भावाच्या प्रेमाचा गोडवा अविरतपणे पाझरावा’ म्हणून भारतीय संस्कृती जोपासणारा सण रक्षाबंधन या सणानिमित्त विद्यालयातील इ.५वी ते इ.१० वीच्या भगिनींनी आपल्या सर्व भावांना राखी बांधून सदैव रक्षण करण्यासाठी आवाहन केले तसेच विद्यालयातील उपशिक्षिका एस.एच. गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी एम. आर.भामरे यांनी मुख्याध्यापक डी.डी.साळुंके, उपशिक्षक के.पी.देवरे, डी.बी.भारती, एम.डी. नेरकर,वाय.डी.बागुल, व्ही.बी.अहिरे,आर.एम. पाटील,एस.जी.पाटील तसेच विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या दत्तक झाडांना राखी बांधून वृक्ष संवर्धना संकल्प केला.
Be First to Comment