सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रायगड जिल्हा गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. नुकतीच मंडळाची नवीन कार्यकारणी तयार करण्याची सहविचार सभा संपन्न झाली. यामध्ये रायगड गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे सर्वानुमते अनिल पाटील यांची रायगड विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली .
अनिल पाटील हे रसायनी गुळसुंदे गावचे रहिवासी असून रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कामोठे येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. जिल्ह्यात त्यांची उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळख आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, इन्स्पायर अवॉर्ड योजना, गणित संबोध परीक्षा , स्कॉलरशिप परीक्षा, शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षणे मध्ये त्यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन आहे.
अनिल पाटील यांना रयत शिक्षण संस्थेचा रायगड आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार तसेच वोडाफोन आयडिया टीचर अवार्ड तर्फे एक लाखाची स्कॉलरशिप मिळाली आहे. अशा उपक्रमशील शिक्षकाची रायगड विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व तालुक्यातून व जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी पाटील एस. एस. चिनके ए.सी., तांबे एम. एम . , कुंभार जे.के., शिंदे एस. बी.आणि विविध तालुक्यांचे अध्यक्ष व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.








Be First to Comment