Press "Enter" to skip to content

देशभरातील ४० महाविद्यालयांच्या टीम स्पर्धेत सहभागी

रसायनी ‘पिल्लई’च्या विद्यार्थ्यांनी बनविलेली ‘क्वाड बाइक’ राष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

रसायनीच्या एचओसी पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली ‘ऑल तेरे क्वाड बाइक’ राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी ठरली. मदुराई येथे झालेल्या इंडियन सोसायटी ऑफ न्यू एरा इंजिनिअर्स या राष्ट्रीय स्पर्धेत बाइकने दुसरा क्रमांक पटकविला. देशभरातील ४० महाविद्यालयांच्या टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. पाच दिवस चाललेल्या स्पर्धेत क्वाड बाइक बनविणाऱ्या २२ NEE MOTO SPOR जणांचा सहभाग होता.

इंडियन सोसायटी ऑफ न्यू एरा इंजिनिअर्स संस्थेतर्फे सेतू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये स्पर्धा झाली. कठीण परिस्थितीत रस्त्यावर चालणारी ही ऑल टेरेन क्वाड बाइक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पिल्लई महाविद्यालय प्रशासनाने यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले. २०० किलो वजनाची २५० सीसी इंजिन क्षमतेची क्वाड बाइक इतर कॉलेजच्या तुलनेत सरस ठरली असून, शेवटच्या राउंडमध्ये आठ जणांना टक्कर देत क्वाड बाइकने दुसरा क्रमांक मिळविला.

रसायनीच्या एचओसी पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली ‘ऑल तेरे क्वाड बाइक राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी ठरल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविण्याबरोबरच सर्वोत्तम क्षमता आणि इधनबचत, सर्वोत्तम अक्स्लेरेशन, सर्वोत्कृष्ट बनावट आणि सजावट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सीएई पुरस्कार आदी नऊ पुरस्कार पटकावून क्वाड टॉर्क २०२२ स्पर्धेवर स्पर्धकानी ठसा उमटवला आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे ही बाब सर्वात प्रथम आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यातच स्पर्धेत दुसरा क्रमांक पटविणे ही भाग्याची बाब आहे. यासाठी कॉलेजचे सहकार्य, टीमची मेहनत आणि सर्वांची साथ मोलाची आहे. पुरस्काराने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

– अनिश शिवराजन सदस्य, स्टार्कर्स मोटारस्पोर्टस, पिल्लई कॅम्पस रसायनी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.