Press "Enter" to skip to content

तुराडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाऊ दत्तू ठाकूर बिनविरोध

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

तुराडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रतिभा दिलीप कोणकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच चंद्रकांत भोईर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेविका अस्मिता मोकल यांनी उपसरपंचपदाची निवडणूक घेतली.यावेळी उपसरपंच पदासाठी भाऊ दत्तू ठाकूर यांनी अर्ज दाखल केला.तुराडे ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी भाऊ ठाकूर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे ग्रामसेविका अस्मिता मोकळ यांनी जाहीर केले.

यावेळी अध्यक्षस्थान भुषविलेले सरपंच चंद्रकांत भोईर,सदस्य विश्वनाथ गायकवाड,मनोहर चव्हाण, हर्सल पाठारे, प्रतिभा कोणकर, नंदिनी दादासो आटपाडकर, गुरुबाई लालू राठोड व इतर मान्यवर उपस्थित होते. भाऊ दत्तू ठाकूर यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर जमलेल्या नागरिकांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.

यावेळी मावळत्या उपसरपंच प्रतिभा कोणकर यांना सरपंच चंद्रकांत भोईर यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले तर नवनिर्वाचित
उपसरपंच भाऊ ठाकूर यांना प्रतिभा कोणकर यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांना उपसरपंच पदाच्या खुर्चीत आसनस्थ केले.

यानंतर सरपंच चंद्रकांत भोईर यांनी प्रतिभा कोणकर यांनी चांगले काम केल्याची कबुली देऊन भाऊ ठाकूर यांच्या कडून अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त केली.यानंतर सदस्य विश्वनाथ गायकवाड यांनी आपल्याला मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित उपसरपंच भाऊ ठाकूर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना तुराडे ग्रामपंचायत यांनी विकास कामे ही तुराडे गावात आणि कष्टकरीनगर तसेच ठाकुरवाडीत अगदी उत्कृष्ट केली आहेत.यापुढेही असेच होत राहील अशी ग्वाही दिली.

यानंतर चाहत्यांनी उपसरपंच भाऊ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व वाजत गाजत त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.