सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रायगड जिल्हा आणि पनवेल शहर जम्प रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या जिल्हास्तर जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन स्मिता पनवेलकर (अध्यक्षा जम्प रोप असोसिएशन पनवेल) व प्रतिक कारंडे
(आयोजक / सचिव जम्प रोप असोसिएशन पनवेल) यांनी समाज मंदिर हॉल नवीन पनवेल येथे करण्यात आले होते.
यामध्ये रायगड जिल्हा आणि पनवेल शहर मधून एकूण 180 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धा खुप उत्साहात आणि निर्विवाद पार पडली.

यात निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूकापूर शाखेने वर्षी प्रथम विजेतेपद तर प्रशांत गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्ली शाखेने द्वितीय पारितोषिक कु. मनीष पनवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल संघाने तृतीय पारितोषिक आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी संघाने चतुर्थ पारितोषिक पटकावले. यात रसायनी येथील संजय काशिनाथ पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी चार गोल्ड मेडल,दोन सिल्व्हर व दोन ब्रांझ मेडल पटकावले. यात विनायक पाटील,भावार्थं धुमाळ,अनुसया कदम व कादंबरी चौधरी यांनी गोल्ड मेडल पटकावले.तर ऋषभ मोरे व आर्यंन दिलोड यांनी सिल्व्हर व स्वरूप पाटील, ज्ञानेश्वर कदम यांनी ब्रांझ मेडल पटकावले.
दरम्यान सर्व विजेत्या स्पर्धकांची २७/२८ ऑगस्ट २०२२ रोजी नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जम्प रोप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आणि जम्प रोप असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर सर यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment