उरण शहरातील समस्या सोडविण्याची प्रकाश पाटील यांची मागणी
सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
उरण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी उरण शहरातील विविध समस्या बाबत उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देऊन शहरातील समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली आहे.
उरण शहरातील विमला तलावातल कारंजे चालू करणे,तलावाच्या बाजूची भिंत उभी करणे,साईडचे लाईट लावणे , शौचालय स्वच्छ करणे, पडीत सुकलेली झाडांची मशागत करणे व तलावतील निर्माल्य बाहेर काढणे या संदर्भात तसेच कोटनाका येथील मच्छिमार्केट येथील रस्ता दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती व तेथील आजूबाजूला असणारा परिसर स्वच्छ करावा अशा मागण्या प्रकाश पाटील यांनी निवेदना द्वारे केले असून सदर कामे गणपती उत्सवाच्या अगोदरच करावे .असे निवेदनात विनंती केली आहे .
मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सदर कामे गणपती उत्सवाच्या अगोदरच होतील असे आश्वासन प्रकाश पाटील यांना दिले आहे . निवेदन देतेवेळी उरण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील, उरण शहर महिला उपाध्यक्ष चंदा मेवाती,विजय गायकवाड, शकिर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment