सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
लाईट ऑफ लाईफ संस्थेच्या आनंदो प्रकल्प अंतर्गत शालोपयोगी साहित्य वाटप आणि डिजिटल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल व्हॅनचा उपयोग शैक्षणिक उपक्रम, जादा तासिका , बाल कला महोत्सव आदींसाठी विद्यार्थ्यांना केला जाणार आहे.
दहिवली येथील जनता विद्यालयामध्ये डिजिटल व्हॅनचा उद्घाटन सोहळा व विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कांचन थोरवे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. पाहुण्यांचा परिचय वैशाली नेमाडे यांनी करून दिला. त्यानंतर लाईट ऑफ लाईफ संस्थेच्या संस्थापक डॉ. विली डॉक्टर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून डिजिटल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक विवेक दांडेकर, शालेय समिती सदस्य कृष्णा लाड, अमोल क्षीरसागर, रमेश दासवानी आदी उपस्थित होते.
यावेळी आनंदो प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांनतर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. उपस्थित पाहुण्यांनीही आपले विचार मांडले. सुत्रसंचालन वैशाली नेमाडे तर आभार प्रदर्शन तानाजी खोमणे यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका ज्योती घरत, डॉ. शारदा निवाते, राजश्री केदार, मोहिनी हजारे, प्रिया सोनावळे, शिला रांगणेकर, संगीता चंदने, सुनील शेंडे आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
—– डिजिटल व्हॅन —–
या व्हॅन मध्ये वाय – फाय ची सुविधा असून पंधरा संगणक त्यामध्ये आहेत. या संगणकाच्या आधारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती, त्या – त्या इयत्तांचा अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांना गुगल च्या साहाय्याने अधिक माहिती उपलब्ध असणार आहे.








Be First to Comment