सिटी बेल ∆ पनवेल ∆
पनवेल मधील जाणीव एक सामाजिक संस्था व रायगड तायक्वांडो असोसिशनच्यावतीने तायक्वांडो आमदार चषक 2022 ही भव्य राज्यस्तरीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधू ह्या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते या तायक्वांडो स्पर्धेचे उद्घाटन झाले.
जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील व रायगड तायक्वांडो ओसीएकशन यांच्या तर्फे तायक्वांडो ही भव्य जिल्हा स्तरीय तायक्वांडो स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्यासाधून आयोजीत करण्यात आली होती. ही एक दिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धा पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते झाले असून या स्पर्धेत जिलह्यातील 500 हून अधिक स्पर्धत सहभागी झाले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, निता माळी, सदानंद ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, रायगड जिल्हा तायक्वांडोचे असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष सदानंद निंबरे, सरचिटणीस सुभाष पाटील, खजिनदार प्रभाकर भोईर, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, प्राचार्य आनंद सर, महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, सांस्कृतिक सेल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, अरुण सोळंकी, आदिती मराठे, लीना पाटील, स्नेहल खरे, चंद्रकांत पाटील, उमेश इनामदार, प्रसाद हनुमंते, प्रसाद म्हात्रे, मनोज पाटील, रुपेश नागवेकर, प्रवीण काणे, महेश सरदेसाई, शैलेश कदम, राहुल सावंत, प्रसाद कंदारे यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनाचे औचित्यसाधून आंतराष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावलेल्या प्राजक्ता अंकोलेकर, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावेलेल शुभमपोवार, जपान येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेले पुनीत पाटील, कोरिया येथील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेले ओंकार भगत यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते स्नन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
Be First to Comment